पुणे : भारतीयांना करियरमध्ये प्रगतीसाठी आणि कामासाठी मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्येच संधी दिसत असल्याचे 'इन्डीडने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. भारतीयांना नोकरी शोधण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या इन्डीडने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या नामांकन आणि प्रतिक्रियांच्या आधारे देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील यावर्षीच्या आघाडीच्या कंपन्यांची घोषणा केली आहे. जागतिक पातळीवरील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या सॅप, अडोब, व्हीएमवेअर आणि मायक्रोसॉफ्ट या यादीत आघाडीवर आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ही या यादीत स्थान मिळविलेल्या काही मोजक्या देशांतर्गत संस्थांपैकी असून सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेली एकमेव संस्था आहे. महत्त्वाचे ५ वे स्थान इस्रोने मिळवले असून २०१८ मधील दहाव्या स्थानावरून ही झेप संस्थेने घेतली आहे. यानंतर अनुक्रमे सिस्को, मिंत्रा, पेटीएम, आयबीएम, फ्लिपकार्ट, अॅप्पल, अॅमडॉक्स, जेनपॅक्ट, टीसीएस, एम्फसीस आदी ई-कॉमर्स कंपन्या आघाडीच्या १५ कंपन्यांमध्ये सहभागी असून ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी चांगली संधी असल्याचे यातून दिसून येते. या यादीमध्ये असलेल्या कंपन्यांनी सातत्याने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गरजांकडे सातत्याने लक्ष दिले जेणेकरून त्यांच्या करियरकडून असलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊ शकतील आणि काम करून त्यांना समाधान मिळेल, याचे प्रमाण कंपन्यांच्या पेजवर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या मानांकनामधन दिसन येते. मम्थेतील पोषक वातावरण आणि कामाप्रति असलेला संतुलित दृष्टिकोन यासारख्या काही गोष्टींना कर्मचाऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. इन्डीड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री शशी कुमार म्हणाले, काम करण्यासाठी सर्वसमावेशक वातावरण निर्मिती करणे, कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीप्रती आपुलकीची भावना आणि निष्ठा निर्माण करणे या गोष्टीही इतर अनेक गोष्टींप्रमाणे एकूण उत्पादकता वाढवतात. कामाच्या पलीकडे जाऊन काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या कंपन्या, कंपनीविषयी कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या प्रतिमेवर सकारात्मक परिणाम घडवन आणतात.
यशस्वी करिअरकरिता भारतीयांचे बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्राधान्य : इन्डीड