ऐन नाताळात स्ट्रॉबेरीचा तुटवडापाचगणी डापाचगणी

पुणे : थंडी सुरू झाली की महाबळेश्वर, वाई, डापाचगणी भागातील लालचुटूक स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होते. नाताळात तर महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीला देशभरातून मागणी असते. मात्र यंदा उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले असून उत्पादन ४० ते ५० टक्कयांनी घटले आहे. यंदाच्या नाताळात स्ट्रॉबेरीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. स्ट्रॉबेरी विक्रेते, उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी ऐन हंगामात निराशा पडली आहे. __ यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाऊस सुरू होता. अवेळी झालेल्या पावसामुळे बहुतांश शेतीमालाचे नुकसान झाले. कांद्यासह पालेभाज्या तसेच अन्य फळभाज्यांचे नुकसान झाले. महाबळेश्र्वर, पाचगणी, वाई भागातील वातावरण स्ट्रॉबेरीला पोषक आहे. देशाच्या कोणत्याही भागात महाबळेश्वर एवढे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात नाही. अवेळी झालेल्या पावसामुळे यदा स्ट्राबरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत आवक निम्म्याने कमी नत आवक निम्म्यान कमा झाली आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड फळबाजारातील स्ट्रॉबेरी व्यापारी युवराज काची यांनी दिली. स्ट्रॉबेरीचे रोप नाजूक असते. दर हंगामात स्ट्रॉबेरीची रोपे आणून लावली जातात. साधारणपणे जून-जुलैमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. ऑक्टोबरमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन हाती येण्यास सुरुवात होते. त्यानंतर आवक सुरू होते. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात स्ट्रॉबेरीची आवक वाढते, असे दरवर्षीचे चित्र असते. यंदा मात्र अवेळी झालेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या लागवडीवर परिणाम झाला असून उत्पादन ४० ते ५० टक्कयांनी कमी झाले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मार्केटयार्डातील फळबाजारात दररोज १० टन स्ट्रॉबेरीची आवक होत होती. यंदा स्ट्रॉबेरीची आवक दररोज २ ते ३ टन एवढी होत असून मागणीच्या तुलनेत स्ट्रॉबेरीची आवक अतिशय कमी असल्याचेही काची यांनी सांगितले. दरवर्षी नाताळ सण सुरू होण्यापूर्वी स्ट्रॉबेरीच्या मागणीत दुपटी-तिपटीने वाढ होते. पुण्यातील बाजारपेठेतून गोवा, मुंबई, बंगळुरू, हैद्राबाद, दिल्ली येथे स्ट्रॉबेरी विक्रीसाठी पाठविली जाते. ३१ डिसेंबरनंतर दोन ते तीन दिवस मागणी कायम असते. यंदा स्ट्रॉबेरीचे उत्पादन कमी झाले असून बाजारात तुटवडा आहे.