अखेर तलाठी भरतीची प्रक्रिया सुरू : पुणे जिल्ह्यात ८९ जागा

पुणे : पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात जून महिन्यात तलाठी भरतीसाठी उमेदवारांची परीक्षा घेतली. पुणे जिल्ह्यात ८९ जागांसाठी तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परंतु, महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून घेतलेल्या या परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ व संभ्रमाचे वातावरण असल्याने परीक्षा होऊन देखील परीक्षा निकाल व पुढील सर्व प्रक्रिया रखडल्या होत्या. परंतु महाआघाडी सरकारने ज्याज्या पदासाठी परीक्षा घेण्यात आल्यात त्याची पक्रिया पर्ण करण्याचे आदेश महापरीक्षा पोर्टलला दिले ज्यानमा नलानी भरनी धेना निकाल नुकताच जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता यावी, सर्व प्रक्रिया ऑनलाइन व्हावी, म्हणून तत्कालीन भाजप सरकारने महापरीक्षा पोर्टल सुरू केले. संदर्भात उमेदवारांनी हरकती घेतल्या. राज्यातून सर्व उमेदवारांनी या संदर्भात सोशल मीडियावर चळवळ उभी केली. विविध जिल्ह्यांत जिल्हाधिकाजयांना विधानसभेपूर्वी पोर्टल बंद करण्याचे निवेदन दिले. आचारसंहितेत भरतीप्रक्रिया रखडली, मात्र, विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा पोर्टल बंद करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली. पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकाच वेळी तलाठी भरतीसाठी ३ जून रोजी परीक्षा घेतली. परंतु निवडणुका आणि त्यानंतर महापरीक्षा पोर्टल संदर्भात झालेल्या वादामुळे परीक्षेचा निकाल लागण्याची प्रक्रिया रखडली होती.महापरीक्षा पोर्टलच्या वतीने नुकतेच जिल्हानिहाय निकाल शासनाच्या संकेतस्थळांवरून प्रसिद्ध केले आहेत. पुणे जिल्ह्यात ८९ जागांसाठी ही परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल जिल्हाधिकाजयांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. निकाल जाहीर होऊन । पंधरा दिवस झाले परंतु पुढे काय प्रक्रिया राबविण्यात येणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. ___कागदपत्रांची कडक पद्धतीने छाननी होणारपुणे जिल्हा तलाठी भरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून, त्यात मोठ्या प्रमाणात अपारदर्शकता आढळली आहे. च्यामध्ये काही उमेदवार हे चुकीच्या पद्धतीने (जसे की डमी उमेदवार बसवून, हायटेक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वापरून किंवा मास कॉपी करून) गुणवत्ता यादीत आले असल्याचा आरोप स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या वतीने केला आहे. च्या संदर्भात प्रशासनाने पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची अत्यंत कडक पद्धतीने छाननी करून मुलाखती घ्याव्या, अशी मागणी परिषदेच्या वतीने करण्यात आली. ___ उमेदवारांच्या कागदपत्रांची लवकरच छाननीजिल्ह्यात तलाठ्यांच्या ८९ जागांसाठी जून महिन्यात परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल महापरीक्षा पोर्टलच्या वतीने नुकताच जाहीर केला आहे. आता उमेदवारांच्या कागदपत्रांची मागणी महापोर्टलकडे केली असून, ती प्राप्त झाल्यानंतर पुढील आठवड्यात पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करणार आहे. त्यानुसार उमेदवाराच्या मुलाखती घेण्यास सुरुवात होईल.