आयएनआयएफडी डेक्कन-पणेच्या आगामी भव्य वार्षिक फॅशन शोच्या विकास योजनेवर लॅक्मे फैशन वीकच्या प्रतिथयश फॅशन डिझायनर यांनी टाकला प्रकाश

पुणे : नोव्हेंबर महिन्यातील, मुलाखतीवर प्रभुत्व या विषयावरील कार्यशाळेनंतर; डिसेंबरमध्ये सेलेब्रिटी डिझायनर - नीलांजन घोष यांनी, आयएनआयएफडी डेक्कन-पुणेच्या होतकरू फॅशन डिझायनर्सचे प्रबोधन केले. एक तर्कसंगत आणि साधे फॅशन डिझायनर असलेल्या नीलांजन यांना डिझाईन, विकसन आणि उत्पादन क्षेत्रामध्ये १४हून अधिक वर्षाचा अनुभव असून भारतातील आघाडीच्या स्टोअर्समध्ये त्यांचे काम पाहायला मिळते. 'राम-लीला' आणि –'बाजीराव मस्तानी' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यासारख्या बॉलिवूड कलाकारांच्या वेशभूषेसाठी त्यांची संकल्पना आणि रेखाटन याचा वापर केला गेला आहे. आगामी वार्षिक भव्य फॅशन शोसाठी तयारी करीत असलेल्या फॅशन होतकरूंकरीता डिझाईन आणि संकल्पना यासाठी त्यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरली. त्यांनी चित्रपटासाठी तयार केलेली स्टोरीबोर्ड डिझाईन्स विद्यार्थ्यांच्या खूप कामी आली, ज्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. या व्यतिरिक्त, त्यांनी जगाच्या वास्तविक अंतरंगाकडे दृष्टी टाकली. वास्तविक जगामध्ये तग धरून राहण्यासाठी मनुष्य-व्यवस्थापन हे शिकणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपले अनुभव आणि चुका यापासून शिकता यावे यासाठी त्यांनी आपली कहाणी कथन केली. प्रश्नोत्तराच्या सत्रामधील 'माणूस आपल्या राज्यामध्ये राजा असू शकतो, परंतु ज्ञान असलेला माणूस संपूर्ण विश्वाचा राजा असू शकतो.' या विधानावरून, आयएनआयएफडी डेक्कनच्या फॅशनच्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या बुद्धिमत्तेचे प्रतिबिंब पडले. त्यादिवशी, विद्यार्थ्यांचे समाधान आणि यश याला नेहमीच प्राधान्य देणार्या आयएनआयएफडी डेक्कनच्या दूरदृष्टीची त्यांच्या विद्यार्थ्यांनी खरोखर प्रशंसा केली. अतिशय जाणकार आणि अत्यंत अनुभवी व्यक्तीच्या, ज्ञानपूर्ण सत्राचे, विद्यापिठाने केलल्या आयोजनाचे, फॅशनच्या विद्यार्थ्यांनी, 'आयएनआयएफडी रॉक्स' अशा शब्दात कौतुक केले.