सरकारी कार्यालयांमध्ये चुना-नो तंबाखू'

 पुणे : सरकारी कार्यालये म्हटली की, ठिकठिकाणी पान-तंबाखूच्या पिचकाऱ्या दिसतात असतात; तर कठे डबी कादन चना लावून तंबाखमळत रेंगाळत बसलेली माणसेही जागोजागी आढळतात. मात्र, आता सरकारी कार्यालयांमध्ये हे चित्र दिसणार नाही...सरकारी कार्यालये आता तंबाखूमुक्त केली जाणार आहेत. __सरकारी कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी आता सरकारी पातळीवरच प्रयत्न जाणार आहेत. त्यासाठी पथके नेमण्यात येणार असून, यापुढे सरकारी कार्यालयांमध्ये तंबाखू-चुना चोळत पिचकाऱ्या मारण्यास बंदी असणार आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक नुकतीच जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात झाली. या बैठकीत सर्व सरकारी कार्यालये तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एनांदापुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तंबाखू नियंत्रण कायदा महत्त्वाची कलमे यावर चर्चा करण्यात आली. तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कशी करायची; तसेच जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकांकडून करण्यात येणारी कार्यवाही याबाबत बैठकीत ऊहापोह करण्यात आला. 'सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबत बैठकीत चर्चा झाली,' असे जिल्हा शल्यचिकित्सक नांदापूरकर यांनी सांगितले. बैठकीला पोलिस आयुक्त कार्यालयाचे विजय टिकोळे, पोलिस अधीक्षक कार्यालयाचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वय अधकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, सल्लागार डॉ. राहल मणियार, पुणे महानरपालिकेचे विनोद जाधव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे दिलीप करंजखेले, जिल्हा अधिकारी कार्यालयाचे गणेश फुदे, परिवहन विभागाचे चंद्रकांत माने, अन्न व प्रशासन विभागाचे शंतनू जगदाळे, ज्योती धमाळ आदी उपस्थित होते.