पुणे : सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) याविरोधात देशभरात सध्या असंतोषाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत, मोर्चे काढले जात आहेत. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातही या कायद्याविरोधात शुक्रवारी मुस्लिम धर्मियांनी विराट मोर्चा काढला. पुणे शहरातील कैप येथील बाबाजान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. तर पिंपरी-चिंचवड शहरात कूल जमाआती तंझीम या संघटनेच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आंबेडकर चौकात हजारोंच्या संख्येने मुस्लिम धर्मियांनी शांततेत मोर्चा काढला. सुरक्षिततेच्या कारणास्तव शहरात आणि मुख्य ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दुपारी दोनच्या सुमारास पिंपरीच्या आंबेडकर चौकात मुस्लिम बांधव जमा झाले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, आंबेडकर चौकातून सर्व वाहतूक वळवण्यात आली होती. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेला मोर्चा शांततेत चार वाजता संपला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना मोर्चेकरांनी गलाबाचे फूल देऊन मोर्चाची सांगता केलीपार्थवभमीवर शहरात आणि मख्य चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये २ डीसीपी.एसीपीपोलीस निरीक्षक, ३५० पोलीस कर्मचारी एसआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. यावेळी सोशल मीडियातन पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्रवास ठेव नका. असे आवाहन पोलिसांकडन करण्यात आलं होतं.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये कायद्याविरोधात मुस्लिम धर्मियांचा मोर्चा