देशभरात आज सीएए विरोधात मोठं प्रदर्शन, राजघाटावर एकतेची मानवी साखळी जोडणार MUSLIM HINDU BUDDHIST SIKH CHRISTIAN JAIM DEMOCRACY NOI DICTATORSHIP नवी दिल्ली: आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. आजच्या दिवशीच १९४८ मध्ये नथुराम गोडसेने महात्मा गांधी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. आज या दिवशी देशातील अनेक भागात नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात प्रदर्शन होणार आहे. जामिया मिलियाचे विद्यार्थी राजघाटापर्यंत मार्च काढणार आहेत. मात्र पोलिसांकडून अद्याप त्यांना हा मार्च काढण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. राजघाच येथे सीएए, एनआरसी या कायद्याविरोधात प्रदर्शनादरम्यान मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये तब्बल ६० विद्यार्थी युनियन सहभागी होणार आहेत. ही साखळी सायंकाळी ५.१० पासून ५.१७ या वेळेत करण्यात येणार आहे. याच वेळेत महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. दुसरीकड़े यशवंत सिन्हा यांची गांधी शांती यात्रा आज राजघात येथे समाप्त होईल. गांधींच्या नावावर सीएए ला मोठा विरोध गुरुवारी राजघाटावर नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात प्रदर्शन होणार आहे. येथे मानवी साखळी जोडण्यात येणार आहे. जन एकता जन अधिकार आंदोलनच्या सुरुवातीला तब्बल १०९ संघटना राजघात येथून शांतीवन आणि तेथून पुन्हा राजघाट असा मार्च काढणार आहेत. हा मार्च हनुमान मंदिर, लाल किल्ला, जामा मशिद आणि दिल्ली गेट येथून पुढे जाईल. पालघर येथील आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला काल भारत बंददरम्यान सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनात पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. रस्त्यावर चालणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी काठीने मारहाण केली. Levi's महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळला; अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या
देशभरात आज सीएए विरोधात मोठं प्रदर्शन, राजघाटावर एकतेची मानवी साखळी जोडणार